पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शनिवारी रात्री नवी दिल्ली येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यात नागपूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील नागपूर रेलवे स्टेशन वर काल रविवारला दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली अन्यथा तर एका क्षणात सर्व संपलं असते.
नागपूर रेल्वे स्टेशन मधील मुख्य मार्गावरील मालगाडीला जोडलेल्या टँकरला भिषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. नागपूर रेल्वे स्टेशन येथे आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तडकफडकी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी फलाटावर तेलंगाना एक्सप्रेस उभी होती. ही आग मालगाडीला जोडलेल्या डिझेल टँकरपर्यंत पोहोचली असती तर नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात मोठा अनर्थ घडला असता. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलल्याने ही दुर्घटना टाळली.
प्राप्त माहितीनुसार, रतलाम येथून चंद्रपूर जिल्ह्यातील ताड़ालीला जाणाऱ्या मालगाडीला तेल टैंकर जोडण्यात आला होता. मालगाड़ी दपारी 3.45 वाजता नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 च्या मुख्य मार्गावर उभी होती. तेव्हा मालगाडीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. थोड्याच वेळात आगीची व्याप्ती वाढली. आगीने फलाटाच्या दोन्ही बाजूने लागलेल्या लाकडी शेडला कवेत घेतले.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी फलाट क्रमांक 1 वर तेलंगाना एक्स्प्रेस उभी होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यावर आगीवर निंयंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे नागपूर रेल्वे स्टेशनवरील मोठी दुर्घटना टळली. फलाटावरील घडामोडींचा अंदाज घेतल्यावर तेलंगाना एक्स्प्रेसला पुढे जाऊ देण्यात आले आणि आग ग्रस्त मालगाड़ीला अजनी यार्डमध्ये पाठवण्यात आले.
दरम्यान मालगाडीला आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. तेथे उपस्थित प्रवाशानामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण त्यांना फलाटावर उभ्या असलेल्या तेलंगाना एक्स्प्रेस मध्येच आग लागली असा समज झाला. त्यामुळे काही वेळापर्यंत स्थानकावर अफरातफरी माजली होती. परंतु काही काही काळाने ही आग मालगाडीतील असल्याचे स्पष्ट झाले. ही आग कशी लागली याची चौकशी केली जात आहे.

