उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील बाळापुरात तालुक्यातील हातरुन गावात एकाच समाजाच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. हा राडा इतका भीषण होता की, काही क्षणात गावात गाड्या जाळण्यात आल्या लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली.त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. तर या राड्याच्या पार्श्वभूमीवर हातरून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. करण्यात आलं आहे.
हातरुन गावात क्षुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार वाद झाला. यात दोन गट समोर समोर आले. त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. यावेळी चारचाकी वाहन जाळण्यात आले. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर दोन्ही गटातील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. या घटनेतील 6 जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यातील हातरुन गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. आज सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांत आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली आहे.
एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हातरून गावात पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातं तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

