राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- तालुक्यातील पुणागुडा येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 17 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून वसंत बिजाराम आत्राम वय 55 वर्ष असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणागुडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले तलावाचा 3 वर्षासाठी लिलाव काढुन मासेमारी साठी गावातील इसमाला करारनाम्यावर दिला असुन तलावा मोठ्या प्रमाणात मासे असुन आज दिनांक 17 फेब्रुवारीला दुपारी मासे पकडण्यासाठी पुणागुडा येथील वसंत बिजाराम आत्राम हे गेलेले असता त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झालेले आढळुन आले. असुन ते अंदाजे 55 वर्षाचे होते व त्यांच्या मागे परीवारात पत्नी व दोन मुले व सुन असुन सदर घटनेमुळे संपुर्ण पुनागुडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

