युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन सावनेर:- येथे होगा क्या अब साउथ हिंदी चित्रपटाची शूटिंग अंतिम टप्प्यातील असून येथील ढालगाव खैरी रोडवरील राम गणेश गडकरी कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसोबत शूट घेण्यात आले. तसेच मोहपा येथील देवबर्डी चौक, कोदेगाव येथील संजय बन यांच्या वाड्यात, गोसेवाडी, ईसापूर, मानेगाव, उमरी, सावनेर तालुक्यातील अनेक परिसरात पिक्चर चे चित्रीकरण करण्यात आले.
सावनेर या तालुक्यातील बरेचसे लोकेशन दर्शनीय असून भविष्यात चांगले चांगले चित्रपट निर्माण व्हावे अशी अपेक्षा येथील कलावंतांनी दर्शविली. वास प्रोडक्शन निर्मित होगा क्या अब हिंदी चित्रपट असून चित्रपटाचे मुख्य निर्माता सुरज विश्वकर्मा, डायरेक्टर हेमंत कुमार, मनीष शर्मा एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर नागपूर हे आहेत. या चित्रपटांमध्ये मुख्य साऊथ कलाकार विक्की पवार, प्रियंका महाराज मुंबई, चंद्रशिखा साऊथ महिला कलाकार रायपुर, संदीप त्रिपाठी, अमित पटेल, परसराम चिलानी नागपूर तसेच या चित्रपटात सावनेरचे कलाकार अनिल अडकिने, युवराज मेश्राम, राजूभाऊ कांबे, संजय बन, विजय टेकाडे, राहुल वानखेडे, सौ.ज्योती पारधी, विनोद पारधी झळकणार आहेत.
या चित्रपटाला सावनेर कळमेश्वर तालुक्यात आणण्याचे मोठे श्रेय कोदेगाव येथील संजयजी बन यांना जात आहे.
हिंदी चित्रपट होगा क्या अब ची परिपूर्ण चित्रीकरण सावनेर तालुक्यातच झालेलीं असून आम्ही तालुक्यातील कलाकारांना सुद्धा चित्रपटामध्ये मध्ये छोटे मोठे रोल दिलेले आहे. तसेच हा चित्रपट हाय बजेटचा असून तिला ऑल इंडिया रिलीज लवकरच करणार अशी माहिती सिने कलाकार विक्की पवार यांनी पत्रकारांना दिली.

