मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी प्राचार्य डॉ. रमेश बोभाटे यांचे हृदयविकाराचे झटक्याने दुःखद निधन. त्यांनी 64 वर्षी अखेरचा श्वास घेतला.माजी प्राचार्य डॉ. रमेश बोभाटे हे यशवंत नगर हिंगणघाट येथील रहिवासी होते. त्यांचं दिनांक 13 गुरूवारी दुपारी तीन वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार शनिवार दि. 15 ला सकाळी हिंगणघाट मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात करण्यात आला.
प्रा.डॉ.रमेश बोभाटे विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर येथुन प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले होते ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा सदस्य होते त्याचप्रमाणं प्राचार्य फोरमच्या व अनेक समित्यांवर कार्य केले होते. त्यांचे मागे एक मुलगा, मुलगी, जावाई, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा कॉनडाला असतो.

