उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अकोला येथे उच्चभ्रू वस्तीत एका घरात देहविक्रीच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी 4 तरुणींसह एका तरुणाला घरात कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे.
अकोला येथील जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीत उच्चभ्रू वस्तीत या 4 तरुणी भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. येथे दररोज नव नवीन अनेक पुरुषांची येणे जाणे होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या घरात देहविक्री चालत असल्याचा संशय आला. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी या 4 ही तरुणींना घरात कोंडून ठेवले. तसेच एका तरुणालाही कोंडून ठेवण्यात आलं
याबाबत स्थानिक नागरिकांनी अकोला जुने शहर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले, यावेळी पोलिसांनी 4 तरुणींसह 1 तरुणालाही ताब्यात घेतले. किरायाने खोली घेऊन राहणाऱ्या या चारही तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचं बोलल्या जात आहे. यातील दोन तरुणी पश्चिम बंगालच्या तर दोन तरुणी अकोला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास जुने शहर पोलीस अधिक तपास करत असून पश्चिम बंगालच्या दोन तरुणी अकोल्यात कशा आल्या, कोणाच्या मदतीने वेश्याव्यवसाय करत होत्या. याचा सखोल तपास सुरू केला आहे. अकोला शहरात या घटनेची मोठी चर्चा होत असून स्थानिकांनी देखील पोलिस आल्यानंतर संबंधित घराच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.

