अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १९ फेब्रु:- गुजरखेडी सावनेर येथे एसटी बसच्या थांबा नसल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अनेक वर्षापासून विविध समस्यांच्या सामना करावा लागत होता.भाजपा सावनेर शहर अध्यक्ष राजू भीमराव घुगल यांनी स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेत आमदार डॉ.आशिष देशमुख आणि आगार प्रमुख गुणवंत तागडे यांना जनतेच्या मागण्याचे वारंवार निवेदन देण्यात आले. याची प्रशासकीय पातळीवर दखल घेत मागणीला मंजुरी मिळत यश संपादन केले.
18 फेब्रुवारीला एसटी बस थांबा बस स्टॅन्डचे उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांमध्ये डॉ. राजीव पोद्दार प्रदेश कार्यकारणी सदस्य, मनोहर कुंभारे माजी जि. प. परिषद उपाध्यक्ष, रामराव मोवाडे जिल्हा सचिव,राजु घुगल शहर अध्यक्ष,रोहित मुसळे जिल्हा महामंत्री, मंदार मंगळे सावनेर ग्रामीण अध्यक्ष, अरविंद लोधी माजी न.प. अध्यक्ष , सुजित बागडे, वनिता राजू घुगल माजी नगरसेविका, माया शंभरकर, रेखा पोटभरे, भारती आटणकर, आशा घुगल, इंदिरा बोबडे, ज्योत्स्ना तीमांडे, आशिष माटे, राजेश निंबाळकर, मनोज निंबाळकर, वैभव ढवळे, पिंटू सातपुते, पंकज भोंगाडे, महेश चकोले, माजी नगरसेवक तुषार उमाटे, सुरेंद्र दुबे, नागोराव घुगल, गणेश फुटाणे, धनराज राऊत, राधेश्याम उलमाले, राजाराम गोसावी, लीलाधर जीवतोडे, प्रफुल तीमांडे, राजेश मसने, जगदीश शाहू, देविदास बागडे, संजय जीवतोडे, नंदू वानखेडे, लोकेश तिमांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

