पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यात ट्रॅपिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. विकास कामे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरू नयेत अशी संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. कारण काही दिवसांपासून अगोदर नागपूर हैदराबाद राष्ट्रीय मार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाचा काही भाग खाली आल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दुसरीकडे आज पारडी उड्डाण पुलाचा सिमेंटचा तुकडा चालत्या कारवर पडल्याने कार चालक जखमी झाला आहे. त्यामुळे विकासकामावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर शहरात मागील अनेक वर्षापासून संथगतीने काम सुरू असलेल्या आणि टप्प्याटप्प्याने उद्घाटन होत असलेल्या पारडी उड्डाणपुलाचा सिमेंटचा तुकडा चालत्या चार चाकी कारवर पडल्याची खळबळ जनक घटना आज समोर आली आहे. आज नागपूरच्या प्रजापती नगर चौक, एचबी टाऊन परिसरात या उड्डाणपुलाचा सुमारे 50 ते 60 किलो वजनाचा भाग MH 31 FR 1455 या लाल रंगाच्या कारवर कोसळला. यात कार चालक विशेष श्रीवास्तव जखमी झाले. मात्र, त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उड्डाणपुलाच्या भागाला तडे गेल्याने आणखी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया NHAI यांच्या कडून मागील अनेक वर्षापासून या उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले होते. नुकतेच या पुलाचे काही टप्प्याचे उद्घाटनही पार पडले होते. त्यात या उड्डाण पुलाचा भाग कोसळल्याने या विकास कामांवर नागरिकांनी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

