Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सांगली: भररस्त्यात कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची केली हत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 21, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली: भररस्त्यात कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची केली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधातून कोयत्याने सपासप घाव घालत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. दत्ता शरणाप्पा सुतार वय 30 वर्ष, शिवशंभो चौक, मूळ रा.-इंदिरानगर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना शहरालगत असलेल्या कदमवाडी रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेला दत्ता सुतार हा सेंट्रींग कामगार आहे. तो यापुर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहत होता. त्याच्या बरोबर त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही रहात होता. दत्ता सुतार त्या महिलेसोबत किरकोळ कारणातून वाद घालत मारहाणही करत होता. हे सर्व या महिलेचा मुलगा नेहमी बघत होता त्यातून त्याचा राग उफाळत गेला. यापुर्वी देखील भांडण झाले होते. दत्ताचा काटा काढण्याचा कट यापुर्वीही रचण्यात आला होता. पण बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी त्याला निर्जनस्थळी गाठत कोयत्याने वार करून त्याची हत्या केली.

हत्या करण्यात आलेल्या दिवशी मृतक दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडले होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृतक सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला पैसे देण्यासाठी मृतक सुतार व त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकी MH 9 BQ 4985 ने सांगली वाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले. दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी होते. अनैतिक संबंधाचा राग पुर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला.

दत्ता दुचाकीवरून त्याठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने त्याच्या छातीवर दगड मारला. त्यामुळे दत्ता रस्त्यावर पडला. त्यानंतर या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले. वार इतके वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तेथून पळून गेला. या हल्ल्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्र फिरवत एक तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Tags: Sangali crimeSangali murderSangali policeसांगली: भररस्त्यात कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची केली हत्या.
Previous Post

नागपूरात उड्डाणपुलाचा सिमेंटचा भाग चालत्या कारवर पडून कार चालक जखमी, विकास कामे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरू नये?

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In