अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच नागपूर (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने उपवर-वधु परिचय मेळावा आणि सत्कार समारंभ तसेच स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दि.२३ फेब्रुवारीला मधुमालती सभागृह जुना पांढूर्णा रोड सावनेर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, उद्योग, क्रीडा, शिक्षण, कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ, युवक, युवती, महिला उपस्थित राहणार आहे. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
धनोजे कुणबी समाज ग्रामीण भागामध्ये बहुसंख्येत असून त्यांच्या विविध प्रकारच्या समस्या निराकरण करण्याच्या हेतूने सण २०२० मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त नागपूर येथे धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर या नावाने संस्था पंजीकृत करण्यात आली. सावनेर येथे भव्य समाज भवन उभारून त्या अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा हेतू आहे. ग्रामीण भागातील मुला मुलींच्या लग्न जुळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये समाजातील युवक एकत्र येऊन समाजाचे संघटन मजबूत करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आव्हान मंडळ तसेच युवा मंचाने केले आहे.
पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष गंगाधर माडेकर, सचिव संजय मोवाडे, कोषाध्यक्ष शंकरराव ढोके व समस्त पदाधिकारी तसेच युवा मंचाचे सदस्य उपस्थित होते.

