अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील टाका ग्राऊंड समोरील कम्पाऊंड मध्ये नन्नाशाह बाबा दर्गाजवळ काही गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता अत्यंत निर्दयतेने बांधुन ठेवून असल्याची माहिती वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, या महिती वरून पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता तिथे गोवंश जातीचे एकुण 28 जनावरे कत्तली करीता अत्यंत निर्देयतेने बांधुन असल्याचे दिसून आली.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत 8 लाख 75 हजार रुपये कीमतीचे 28 जनावरे जप्त करून गोवंश जनावरांना चारापाण्याच्या व्यवस्थे करीता व वैद्यकीय उपचार करीता श्री.गौरक्षण संस्था हिंगणघाट येथे ठेवण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी सादिक खालीद शेख यांच्या विरुध्द हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, मनोज धात्रक, नरेन्द्र पाराशर, अरविंद येणुरकर, रवि पुरोहित, रितेश शर्मा, नितीन इटकरे, सागर भोसले, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, विनोद कापसे यांनी केली.

