पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आई आणि मुलीचा एकाच व्यक्तीशी जीव जळला. यावेळी या नराधमाने त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवत ते सोशल माध्यमावर व्हायरल केल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जातो आहे. या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पिढीत विवाहित महिलेचा पती दारूच्या आहारी गेल्याने या महिलेचे एका ड्रायव्हर बरोबर प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचे घरी येणे जाणे सुरू झाले. त्यात या महिलेला दोन मुली होत्या. त्यात मोठी मुलगी वयात येताच, तिचाही त्याच्यावर जीव जडला. त्यानंतर त्याने आई आणि मुलीचा फायदा घेत, त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून आई आणि मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करीत, चक्क ते सोशल माध्यमावर व्हायरल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला दोन मुलीसह जरीपटका परिसरात राहते. तिचे पेशाने ड्रायव्हर असलेला 42 वर्षीय व्यक्तीशी 12 वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यातून दोघेही एकमेंकांशी भेटायचे. अधूनमधून रमेश त्यांच्या घरीही यायचा. त्यावेळी मुली लहान असल्याने तो त्यांचेशीही बोलायचा.
मुली मोठ्या झाल्या. महिलेच्या मोठी मुलीचेही या व्यक्तीवर प्रेम जडले. याचाच फायदा घेत, त्यानेही तिच्याशीही लगट करण्यास सुरुवात केली. महिला घरी नसल्यावर तो घरी यायचा. याशिवाय तिच्याशी व्हिडिओ चॅट करीत, तिचे अश्लील व्हिडिओही बनवायचा. केवळ तिचेच नव्हे तर तिच्या आईचेही त्याने अनेक व्हिडिओ तयार केले होते. त्यातून त्याने त्यांच्यावर अनेकदा अत्याचारही केला.
काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने मुलीचे व्हिडिओ इन्टाग्राम या सोशल मीडियावर टाकल्याने मुलीसोबतच्या प्रेमाचे बिंग फुटले. महिलेला ही बाब कळताच, तिने याबाबत मुलीला विचारणा केली. मात्र, महिलेचे त्याच्याशी असलेल्या संबंधाची माहिती मुलीला झाल्याने तिने आईला प्रतिप्रश्न केला. त्यावर तिने मुलीच्या व्हिडिओ वरून तो ब्लॅकमेल करीत असल्याची बतावणी केली. ही बाब लहान बहिणीलाही माहिती झाली. त्यावरून महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची चौकशी करीत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

