राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील भिवंडी येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणाच्या एक्स बॉयफ्रेंडने तरुणीच्या भावाला मारहाण करून बहिणीला रात्री फोनद्वारे खोटे कारण सांगून रात्री बोलावून घेत तिच्यावर दोन वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिस स्टेशन मध्ये 6 नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर परिसरातील फातमानगर परिसरात राहणारी 22 वर्षीय तरुणी शेलार येथे आतेबहिणीकडे गेली होती. रात्रीच्या सुमारास तिला तिच्या मोबाईल फोन वर भावाचे 15 मिसकाॅल आले होते. 12 वाजता तिला अचानक जाग आली असता तिने मोबाइल मध्ये 15 मिसकाॅल बघितले आणि भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन लावला. त्यावेळी भावाने, ‘माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये’ असे सांगितले. त्यामुळे ही तरुणी ओळखीच्या असलेल्या रिक्षाचालकाबरोबर बागे फिरदौस येथे आली. तिच्या एक्स बॉयफ्रेंड तेथे दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू व इतर दोन जण सर्व रा. फातमानगर यांनी पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षाचालकास मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपांत पीडितेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी एक्स बॉयफ्रेंड हे दोघेही एका गावातील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाला. पीडितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत नवीन नाते जोडल्याचं समजताच, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला हे सहन झालं नाही. संतापाच्या भरात त्याने आपल्या पाच मित्रांच्या मदतीने तिच्याशी सूड घेण्याचा कट रचला.
धमकी देत परत दुसऱ्यांदा बलात्कार: नराधमांनी एकदा बलात्कार केल्यानंतर पिढीत तरुणीला परत फातमानगर येथे घेऊन आले. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी, तिचा भाऊ व रिक्षाचालकाला धमकावून पसार झाले.
या घटनेनंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये धाव घेऊन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पहिला गुन्हा शांतीनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडला असल्याने तो शांतीनगर पोलिस स्टेशन मध्ये वर्ग केला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

