आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मागील काही दिवसांपासून पुण्यात वेगवेगळ्या परिसरात घरफोडी आणि वाहनचोरी घटनेत वाढ झाली आहे. त्यात गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पोलीस पथकाने धडक कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडी व वाहन चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड व अकबर शेख यांना गुप्त माहिती मिळाली. त्या माहिती वरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या हडपसर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. चोरीस गेलेले 76 हजार रुपयांचे दागिने जप्त केले. तसेच सांगवी येथून या चोरट्याने मोटारसायकल चोरली होती. ती मोटारसायकल जप्त केली आहे.
वरील कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, अकबर शेख व उमाकांत स्वामी यांनी केली.

