अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाटमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट माजवला असून दोन दिवसात दोन चोरीच्या घटनेने नागरिकात खळबळ उडाली आहे. त्यात पहिली घटना हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड येथील दाल मिल जवळील एका घरी अज्ञात चोरट्यानी घरातून 10,000 रुपये नकद और 87,000 किमतीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रूपेश ढोके सकाळी 7 वाजता आपल्या चिकन दुकानात गेले होते आणि त्यांची पत्नी समुद्रपुर येथे ड्यूटी वर होती आणि त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाताट ठेवलेले 10,000 रुपये नकद और 77,000 रुपयेच्या सोने और चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी रूपेश ढोके यांनी हिंगणघाट पुलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस आधिक तपास करीत आहे.
हिंगणघाट शहरातील रामकृष्ण लेआउट चोरी: दुसरी घटना 22 फेब्रुवारी घडली असून अज्ञात चोरानी हिंगणघाट शहरातील रामकृष्ण लेआउट येथील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत 1,42,500 रुपये नकदी व सोने आणि चांदीचे दागिने लपास केले.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुपटकर दुपारी 11 वाजता घराच्या दाराला कुलूप लावून दुकानात गेले जेव्हा संध्याकाळी घरी परत आले तर त्यांना त्यांच्या घराच कुलूप तुटून दिसले, त्यांनी घरात प्रवेश केल्यावर अज्ञात चोरांनी घरातील कपाटात असलेले 1,42,500 रुपये नकद व कीमती सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी हिंगणघाट पुलिस स्टेशनला तक्रार दाखल केली, पोलिस पुढील तपास करीत आहे.

