पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीने नागपुर समाज भवनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तिरळे कुणबी सेवा मंडळाची स्थापना १९९७ ला होऊन संस्थेचे पंजीकरण धर्मादाय आयुक्त, नागपूर ह्यांचे कार्यालयात क्र. PT No. 16016-N द्वारे करण्यात आले आहे. संस्थेच्या स्थापनेमध्ये सर्वश्री कै. महादेवराव ढोक, कै. माणिकराव देशमुख, कै. नामदेवराव कोहळे, कै. वासुदेवराव कापसे, कै. जनार्दन मांगे, कै. बबनराव डाखारे, के. प्रकाशराव देशमुख, कै. आशाताई साबळे, महादेव बोराडे ह्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. मंडळाचे आतापर्यंत (अंदाजे) ७०० सभासद आहेत व नोंदणी सुरु आहे.
मंडळाच्या स्थापनेनंतर विशेषतः थोर पुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी कार्यक्रम, उपवर वर-वधु परिचय मेळावे, गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांचा, समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, सामुहिक विवाह सोहळा ईत्यादी उपक्रम मंडळातर्फे सातत्याने राबविण्यांत आले आहेत.
मंडळाला स्वतःचे कार्यालय व सभागृह असावे ह्या दृष्टीकोनातून शासनाकडून जमिनीची मागणी करण्यात आली होती. यानुसार मौजा शिवणगांव येथे १ (एक) एकर जागा मंडळास वाटप करण्यांत आली होती. तथापी ही जागा मिहान प्रकल्पासाठी शासनाने पुनश्च ताब्यात घेतली. सध्या मंडळाच्या निधीतून उपक्रम राबविण्यांत येत आहेत.
मंडळाकडील उपलब्ध निधीमधून मंडळासाठी गंगा सोना अपार्टमेंट, आदर्श मंगल कार्यालयाच्या मागे, जुना सुभेदार लेआऊट, नागपूर येथे कार्यालयासाठी गाळा खरेदी करण्यात आला आहे व सद्यस्थितीत मंडळाचे कार्यालय या ठिकाणी आहे.
मंडळातर्फे सुधाकर देशमुख व सुधाकर कोहळे ह्यांचेकडे सभागृहासाठी जागा किंवा तयार सभागृह मंडळास मिळणे संदर्भात पाठपुरावा सुरु होता. ह्या अनुषंगाने नासुप्रच्या मौजा बिडपेठ, आशिर्वाद नगर येथील सभागृहाबाबत मंडळासाठी मागणी करण्यात आली व दोन्ही मान्यवरांच्या प्रभावी पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस ह्यांचे सहकार्याने मंडळाला ह्या सभागृहाचे वाटप दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यांत आले. तथापी हे सभागृह अपूर्णावस्थेत असल्यामुळे वापरण्या योग्य नव्हते म्हणुन सभागृहाच्या सुधार कामांसाठी निधीची मागणी आमदार मोहन मते, दक्षिण नागपूर विधानसभा ह्यांच्या माध्यमातून करण्यात आली व फेब्रुवारी २०२४ मध्ये रुपये ५.०० कोटी एवढा निधी सभागृहाच्या सुधार कामासाठी मंजुर करण्यात आला. तथापी पुरेसा निधी न आल्यामुळे कामाच्या पूर्णत्वासाठी विलंब होत आहे. पर्यायाने समस्त समाज बांधव या सभागृहातून मिळणाऱ्या सुविधांपासून /लाभांपासून वंचित आहेत.
मंडळातर्फे यापुर्वी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जात होते. तथापी मध्यंतरी तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे व दुर्लक्षीत व्यवहारामुळे मंडळाचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले होते. परंतु जुन २०२३ मध्ये धर्मादाय आयुक्त ह्यांचे आदेशानुसार निवडणूक पार पाडून खालीलप्रमाणे नविन कार्यकारिणी जून २०२३ मध्ये पदारुढ झाली आहे.

