पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघात जोरदार क्रिकेटचा सामना झाला यात भारताने पाकिस्तान संघाचे पानिपत करत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर देशात प्रत्येक गावात आनंद साजरा करत रस्ता रस्त्यांवर फटाके फोडून दिवाळी साजरी केली गेली.
नागपुरात भारतीय क्रिकेट संघाच्या विजय चौकार लागतात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आणि भारत माता की जयच्या घोषणा देऊन लोकांनी आनंद साजरा केला. पण त्यात नागपुरातून मोठी घटना समोर आली आहे. फटाके फोडण्याच्या कारणातून पोलिसांनी 5 तरुणावर कारवाई केली आहे.
नागपुरात नेहमीप्रमाणे नागरिक भारत विजयाचा आनंद साजरा केला. त्यात काही तरुणांना फटाके फोडणं खूप महागात पडल आहे. फटाके फोडल्याने पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी गर्दीत लोकांवर पेटते फटाके फेकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांचा अंगावर पेटते फटाके फोडले: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यावर रात्री 11.00 वाजताच्या सुमारास लक्ष्मी भुवन चौकात हजारो नागरिकांनी एकच गर्दी होती. यावेळी नागरिक आनंद साजरा करत असताना काही तरुणांनी फटाके आणले अन् लोकांच्या अंगावर पेटते फटाके फेकण्यास सुरूवात केली. जल्लोषात आपण काय करतोय, याचं भान या तरुणांना राहिलं नाही. पेटत्या फटाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता होती, प्रसंगी हा खेळ जिवावर उठण्याची शक्यता होती.
पोलिसांनी केली पाच तरुणांवर कारवाई: दरम्यान, गर्दीवर फटाके फेकल्या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून पाच तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरुणांचा हा अल्लडपणा लक्षात घेऊन अंबाझरी पोलीस ठाण्यात पाच तरूणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

