संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्री निमित्त वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेले 3 युवक नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा सध्या शोध सुरू आहे.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम वय 17 वर्ष, मंगेश बंडू चणकापुरे वय 20 वर्ष, अनिकेत शंकर कोडापे वय 18 वर्ष अशी वर्धा नदीत बुडालेल्या तरुणाची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही तरुण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून शोध घेतला जात आहे.