प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.25:- तंत्र व उच्च शिक्षण विभाग, ग्रंथालय संचानालय महाराष्ट्र राज्य मुंबई,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धा ग्रंथोत्सवात संदीप चिचाटे निर्मित महाराष्ट्राची लोकधारा हा सुरेख कार्यक्रम सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालय येथे प्रस्तुत करण्यात आला.
महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे वासुदेव, गोंधळ, जोगवा, लावणी, कोळी गीत, भावगीत, भक्तीगीत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनदर्शन घडविणारे पोवाडे, धनगर गीते यासारखी अनेक लोकगीते व लोकनृत्य प्रस्तुत करण्यात आले.
महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची निर्मिती वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी केली असून वर्धेतील पासष्ट कलाकारांनी एकत्र येत उत्कृष्ट सादरीकरण केले. वेदिका डान्स अकॅडमीच्या यशश्री फटिंगे, पंकज थूल यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य कलाकारांनी लोकनृत्य सादर केले. आशिष ठाकरे व संपूर्ण संचाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उत्कृष्टरित्या मांडला. तसेच ललिता कुकडे,संस्कृती चिचाटे व रॉकस्टार ग्रुपने नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.वर्धेचे सुप्रसिध्द गायक मयूर पटाईत, सानिका बोभाटे, प्रांजली गायकवाड, रिद्धी लेकुरवाळे, चंद्रकांत डगवार यांनी प्रगती संगीत विद्यालयचे संचालक जीवन बांगडे यांच्या मार्गदर्शनात लोकगीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे संचालन संदीप चिचाटे यांनी केले. रंगमंचचे व्यवस्थापन आशिष पोहाणे यांनी सांभाळले.
या कार्यक्रमाला नितीन सोनोने जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सुधीर गवळी प्रकाशक, मिलिंद जूनगडे, प्रा.अरुण हर्षबोधी, नाट्य दिग्दर्शक विकास फटिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

