श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश महाराष्ट्र ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे कौटुंबिक वादातून पत्नीला विष देऊन तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. कोमल नागेश पाटोळे असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. घरगुती वादातून पतीने बळजबरीने विष पाजले असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक कोमल आणि नागेश या दोघांचे 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता या दाम्पत्याला 1 मुलगा आणि एक मुलगी आहे. पती आणि पत्नीमधील वाद इतका टोकाला गेला की, संतप्त झालेल्या पती नागेशने आपल्या पत्नी कोमलला विषारी औषध पाजले. या प्रकरणात केवळ पती सहभागी नव्हता तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता, असा मृतक महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे. विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उशीर झाला.
या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. जोपर्यंत आरोपी पतीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा मृतक महिलेच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

