आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- स्वारगेट बस स्टॅन्ड मध्ये बस मध्ये झालेल्या तरुणावर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत असताना परत एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरले आहे. पुण्यात नांदेड सिटीमध्ये नराधम बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार केला. या नराधम बापाने जवळपास 8 महिने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. आई घराबाहेर गेल्यानंतर बापाकडून मुलीवर अत्याचार केला जात असे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे येथील नांदेड सिटी पोलिसांनी बापा विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 14 वर्षाची असून तर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचे वय 45 वर्षे आहे. हा सर्व प्रकार बाल हक्क समितीने समोर आणला आहे. नराधम आरोपी बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत 8 महिने अत्याचार केला. जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नीसोबत भांडण झाल्याने आरोपीची पत्नी विभक्त राहत होती. तर घरात 14 वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते. जुलै 2024 मध्ये आरोपीने मुलीला धमकी देत आणि मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची तिला धमकी दिली. त्यानंतर आरोपीला हे कृत्य करण्यास आणखीच बळ मिळाल्याने सतत हा प्रकार सुरू होता.
याच दरम्यान नोव्हेंबर 2024 मध्ये आरोपीची पत्नी घरी परत आली. मात्र पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने पुन्हा हा प्रकार सुरूच ठेवला. फेब्रुवारी पर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवायचा, अशी माहिती समोर आली आहे.

