उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रा वस्ती विहार सांगली येथे रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी संचालक चंद्रकांत चौधरी यांचे महामंगलसुत्त आणि त्याचे महत्त्व या विषयावर सकाळी दहा ते अकरा या वेळेत धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम विहाराचे सदस्य राहुल कांबळे यांनी प्रास्ताविक भाषण करून पाहुण्यांचा थोडक्यात परिचय आणि माहिती सांगितली. त्यानंतर आपणा सर्वांचे आदर्श महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य, बोधिसत्व, विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज, आपण खातो तो खास घेतो तो श्वास आणि राहतो तो निवास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धूप दीप आणि पुष्पने वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे सी.बी. चौधरी यांचा सत्कार विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांच्या हस्ते करून त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करूंन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महामंगल सूत्त याची प्रथम फोड करून सांगण्यात आली महा म्हणजे महान मंगल म्हणजे कल्याणकारी, सुत्त म्हणजे सूत्र. हे सूत्र त्रिपीटक ग्रंथातून घेतलेले आहे. यापूर्वी त्रिपीटकाची संपूर्ण माहिती आपणास यापूर्वीच सांगितलेली आहे. ती अवगत आहे तथापि याचा उजाळा म्हणून सुत्त पिटक, विनय पिटक, अभि धम्म पिटक, हे त्रि-पीटक आहे.
सूत्त पीटका मध्ये एकूण पाच भाग आहेत दिघ् निकाय, मझीम निकाय, संयुक्त निकाय, अंगूतर निकाय, आणि खुद्दक निकाय, खूदृक निकाय यामध्ये हे अंतर भूत असून त्यामध्ये एकूण 15 भाग आहेत त्यातील पाचवा सूत निपात असून त्यामध्ये महा मंगल सुत्त आहे.
विनय पिटक यामध्ये भिक्खू साठी नियम असून 1) सूत्त विभंग. A) पारा जिका(प्राय चित्त)227 हे भिक्खू साठी नियम आहेत.
B) पाची तीय (प्राय चित्त) भीक्खूणी करिता 311 नियम आहेत.
2) खुद्दक A) महा वग्ग, B) चुल वग्ग. 3) परिवार-विनय पीटकाचा अंतिम भाग यामध्ये 19 भाग आहेत.
3) अभी धम्म पिटक हे तृतीय धम्म संगीत तिचे फलित आहे.
1) पुप- विद्या. 2) पुग्गल पज्जति 3) यमक 4) कथावत्थु 5) धम्मसंगिणी 6) विभंग 7) धातुकथा
ज्या मंगल वस्तू विषयी देव मनुष्यानी पुष्कळ विचार केला असता, त्यांना स्वतःची सुरक्षितता प्राप्त करून घेता आली नाही, व ज्यांच्या साह्याने सर्व पापांचा नाश करणाऱ्या ज्या 38 मंगल वस्तूंचा देवांचा देव अशा भगवान बुद्धांनी सर्व लोकांच्या हितासाठी बारा श्लोकांमध्ये उपदेश केला आहे. त्या परित्राण मंगल सूत्राचे हे पठण करून सविस्तर माहिती कथन केली.
असे मी ऐकले आहे की, एक समय भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनात आरामात राहत होते तेव्हा रात्र संपत आली असता एक अत्यंत सुंदर देवता सर्व जेतवन प्रकाशित करून भगवान बुद्धा जवळ आली व बाजूला जाऊन भगवान बुद्धांना वंदन करून उभी राहिली त्या उभ्या राहिलेल्या देवतेने भगवान बुद्धांना संबोधून खालील गाथा म्हटली आहे. अनेक देवांनी आणि माणसाने आपले रक्षण कल्याण व्हावे या उद्देशाने मंगल वस्तू विषयी कल्पना विचार केला आहे त्यातील उत्तम मंगल कोणते ते मला आपण सांगावे.
त्यावर भगवान बुद्ध म्हणाले मूर्खां च्या सहवासा पासून दूर राहणे पंडितांची संगत करणे व पूजनीय माणसाची पूजा करणे हे उत्तम मंगल आहे. अनुकूल प्रदेशात निवास करणे भूतकाळात पुण्य केलेले असणे व स्वतःला सन्मार्गास लावणे हे उत्तम मंगल आहे. विद्या संपादन कला आत्मसात करणे, विनयशील आचरण करणे, चांगली वाणी उच्चारणे हे उत्तम मंगल आहे. आई-वडिलांची सेवा करणे पत्नी मुलांचा सांभाळ करणे आणि सुशिक्षित बनविणे, सरळ मार्गाने केलेले कर्म हे उत्तम मंगल आहे. दान करणे, धार्मिक आचरण, नातलगांना मदत करणे, योग्य कर्म करणे हे उत्तम मंगल आहे.
पाप कर्मा मध्ये रममाण न होता त्याच्यापासून दूर राहणे मद्य पानाच्या बाबतीत संयम ठेवणे, आणि धार्मिक कृत्याविषयी दक्षता बाळगणे हे उत्तम मंगल आहे. आदर, नम्रता, संतोष ,कृतज्ञता आणि वेळोवेळी सतधमाचे श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. क्षमा वृत्ती, गोड /मधुर वाणी श्रमणां चे दर्शन, वारंवार धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे पाप क्षालनासाठी तपश्चर्या करणे, पवित्र, आचरण करणे, ब्रह्मचर्य पाळणे, आर्य सत्याचे ज्ञान करून घेणे व निर्वाणाचा साक्षात्कार करणे, हे उत्तम मंगल आहे.
जगातील सर्वसामान्य अनुभवाची म्हणजे लाभ आणि यश , निंदा आणि स्तुती व सुख आणि दुःख या आठ लोक स्वभावाशी आपल्या चित्ताचा प्रसंग आला असता ते विचलित होऊन देणे, शोक रहित निर्मळ व सुखरूप राहणे हे त्या मानवाचे उत्तम मंगल आहे. ह्या प्रकारच्या गोष्टीचे आचरण करून कोठेही पराभव न होता सर्व मानव कुशलतेने सुख प्राप्त करतात. तेच त्यांचे उत्तम मंगल आहे. अशा प्रकारे महा मंगल सुत्तातील संपूर्ण माहिती आपल्या जीवनामध्ये आचरण केल्यास आपले जीवन सुजलाम आणि सुफलाम होते, त्यामुळे आचारो परमो धम्म हे ब्रीदवाक्य आपण आत्मसात करून आपल्या शरीराला चांगले वळण लावल्यास निब्बाण प्राप्त होते. आशीर्वाद गाथा म्हणून सर्वांना आशीर्वाद देऊन त्यांच्या वाणीस पूर्णविराम दिला.
त्यानंतर विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. बौद्ध भिक्खू धम्म दीप यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार आणि स्वागत अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी केले. त्यानंतर त्यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी धार्मिक स्थळाच्या पुज्या, अर्चा करण्याचा अधिकार त्या त्या धर्मातील संघटना संस्थांकडे आहे. धर्माप्रमाणे त्यांचे देवालय, मशिद, मंदिरे, चर्च, अग्यारी, बुध्द विहार प्रत्येक धर्मियांच्या स्वाधिन आहे हे लोक गुण्यागोविंदाने आपआपल्या धर्माप्रमाणे, धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे देशात शांततेणे नादत आहेत. परंतु गया येथील असलेले महाबोधी महाविहार आजपर्यंत भारतीयांच्या ताब्यात दिले गेलेले नाही.
बुध्दगयेच्या संदर्भातील १९४९ च्या बीपी ॲक्ट अनुसार ९ जणाची कार्यकारीणी असून ५ प्रतिनिधी इतर धर्मांचे आहेत तर ४ प्रतिनिधी बौध्द आहेत म्हणजेच हे बुध्दविहार भारतीय बौध्द धर्मियांना सर्व अधिकारानुसार शासनाने दिले पाहिजेत. भारत ही बुध्द भूमी आहे. बुध्दांची जन्मभूमी आहे. असे आपल्या देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती म्हणत असतात. महाविहार हे भारतातील बौध्द धर्मीयांचे पेरणास्थान आहे. त्यामुळे हे महाबुध्दविहार बौध्दांच्या ताब्यात दिले गेले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे, राज्यसरकारात मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. शांततेने मोर्चे, आंदोलन करून अनेक निवेदन समाजातून देण्यात आले परंतु आजपर्यंत मागणीचा विचार करण्यात आला नाही. अनेक वर्षापासून हिंदू महंताच्या ताब्यात हे महाविहार असून ही पवित्र वास्तू बौध्दांच्या ताब्यात मिळावी यासाठी बौध्द अनुयायी सातत्याने परिश्रम करीत आहेत. यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्यावतीने बुध्दगया या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे.
सदर आंदोलनास संपूर्ण देशातून व जगभरातून पाठिंबा मिळत आहे. सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील प्रत्येक विहाराच्या अध्यक्ष यांनी आपल्या लेटर पॅड वर जरूर ते निवेदन तयार करून जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन सकाळी साडेअकरा वाजता देण्यासाठी उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती केली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे दयानंद कांबळे यांचा वाढदिवस संपन्न झाला म्हणून त्यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार आणि शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे विहाराच्या माजी अध्यक्ष सोनूताई चंद्रकांत कांबळे यांचा अष्टयात्तरावा वाढदिवस संपन्न झाला त्यानिमित्ताने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या बारा वर्षाच्या कार्यकर्ते मध्ये आपण ज्या तळमजल्यावर धम्म देशना इत्यादी कार्यक्रम करीत आहोत हे सर्व त्यांच्या अथक परिश्रमाचे श्रेय आहे हे श्रेय आपणास विसरून चालणार नाही त्यांच्या भावी जीवनात दीर्घायुष्य निरोगी आरोग्य लाभणे बाबत भंतेजी धम्म दीप यांच्याकडे याचना करून आशीर्वाद घेतले. प्रमाणे जी.डी. दांडे सर यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात आले. त्यानंतर धम्म पालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
सदर कार्यक्रमास बोधिसत्व धम्म रत्न बोर खडे मामा, दयानंद कांबळे, विकास भिसे सर, पवन कदम विहाराच्या माजी संचालिका शेळके ताई, विहाराचे सल्लागार उप प्राचार्य अडवोकेट संजीव साबळे सर, जगन्नाथ आठवले, शील रत्न काकडे आणि त्यांची लहान मुले इत्यादी उपस्थित होते

