अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ४ मार्च:- सावनेर येथील बसवार लेआउट पासून ते नदीपर्यंत पाणी निघण्या करिता नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपा नेते रामरावजी मोवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सावनेर शहर अध्यक्ष राजू घुगल, सावनेर तालुका अध्यक्ष मंदार मंगळे, आशिष मानकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आले. हे बांधकाम दलितेतर फंडातून असून १० लाख २७ हजार रुपय खर्च होणार आहे.
ही नाली झाल्यामुळे मूकबधिर शाळा, अवदुत वाडी, गिरीश संकुल मध्ये साचणारे पाणी नदीपर्यंत पोहचेल. ही उर्वरित नाली कृषी मंडीच्या कंपाऊंड वालला लागून निघत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी कुठेही साचणार नाही ते सरळ नदीमध्ये जाईल. वस्तीतील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल.

