अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न व औषधी प्रशासन ने कारवाई
करून विठोबा चौका जवळ असलेल्या मंगेश टोटलवार यांच्या शिव ट्रेडर्स दुकान वर धाड टाकून सुगंधी तंबाखू विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अन्न व औषधी प्रशासनाकडून सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून एकूण 33 हजार 23 रुपयाचा विक्रीस ठेवलेला माल जप्त केला आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी मंगेश टोटलवार याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी मंगेश टोटलवार हा गेल्या अनेक दिवसांपासून सुगंधी तंबाखू धंद्यात लिप्त असल्याची ही गोपनीय माहिती अन्न औषधी प्रशासनाला मिळाली होती. माहितीच्या आधारावर ही कारवाही अन्न व औषधी प्रशासनाकडून करण्यात आली.
हिंगणघाट शहरात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात असून अजूनही मोठे मासे
कारवाई पासून दूर असल्याची चर्चा शहरात असून अनेक ठिकाणी सुगंधी नकली तंबाखू बनविण्याचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा या कारवाई नंतर शहरात सुरू आहे. तंबाखू विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असून मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय भरारी घेत आहे. तेव्हा अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले असून सतर्क झालेला अन्न व औषधी प्रशासन विभाग आपली कर्तबगारी कशाप्रकारे पार पडणार हा आता महत्त्वाचा विषय ठरू लागला आहे.
दिवस ढवळ्या खुलेआम पान टपऱ्या वर व्यवसायिकांना सुगंधी तंबाखूची घरपोच डिलिव्हरी हे व्यापारी निरंतर करताना दिसत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असणे म्हणजे डोळे झाक पणा तर नाही ना अशी सुद्धा शंका निर्माण होत असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. तेव्हा पुढील दिवसात मोठ्या माश्या वर अन्न व औषधी प्रशासन कशाप्रकारे कारवाईचा बडगा उगारतात या कडे नागरिकांची लक्ष लागले आहे.
या कारवाईत मंगेश टोटलवार याच्यावर अन्न औषधी प्रशासन ने नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
पुढील कारवाई हिंगणघाट पोलीस करत आहे.

