रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- मुस्लिम समाजातील पवित्र सन म्हणजे रमजान सुरू झालेले आहेत, परतुर शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज बांधव आहेत, परतुर शहरातील मुस्लिम समाजातील अधिक लोकसंख्या गोर गरीब-कष्टकरी कामगारांची असुन हे लोक दिवस भर पोटासाठी मोलमजुरी व छोटे मोठे व्यवसाय करून रात्री उशिराने घरी येतात, उशिराने घरी येत असल्यामुळे रमजानासाठी लागणार्या आवश्यक
वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये जावे लागते खरेदी चालु असतानाच पर्यंत मार्केटचे वेळ संपते आणि मार्केट बंद होऊन जाते त्यामुळे पुरेसा खरेदी विक्री होत नाहीत, म्हणून परतुरच्या पोलिस निरीक्षकांनी मुस्लिम बहुल भागात तरी रमजान निमित्त रमजान पुरते तरी मार्केटला रात्री १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावा अशी मागणी परतुर शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामाजीक कार्यकर्ते, इजरान कुरेशी यांनी केली आहे.

