मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रा .प .हिंगणघाट आगाराच्या वतीने बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.किरण वैद्य, वाहतूक निरीक्षक मनोहर वाणे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. वैद्य यांनी दैनंदिन जीवनात प्रत्येकाने अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करावा. मराठी भाषा ही अत्यंत लवचिक असून दर बारा कोसावर भाषेचे उच्चारण बदलत जाते. हीच मराठी भाषेची महती आहे. असे विचार प्रकट केले. वाहतूक निरीक्षक वाणे यांनी कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी अध्यक्ष भाषणात आगार व्यवस्थापक शिंदे यांनी मराठी ही आपली मातृभाषा असून प्रत्येक इंग्रजी शाळेत अनिवार्य करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील कवी व लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह संचालन सय्यद आसिफ यांनी केले. आभार रवींद्र डंभारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता हितेंद्र हेमके, शम्मी पठाण, राजू वरघने, यशवंत डाखोरे राहुल मून ,मयूर काठोळे, प्रफुल मांडवकर, बबीता मून ,बबीता दमके, रूपाली मडावी, निलेश उघडे, विवेक मांडवकर, सचिन बुटले, संजय भुसारी, उत्तम खडसंगे आदींनी सहकार्य केले.

