श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत व आदित्य शिक्षण संस्था बीड संचलित आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथील बी. एस्सी. कृषी पदवीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय शैक्षणिक सहली च्या अभ्यास दौरा राज्यांमधील राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कृषी संशोधन केंद्र, संशोधन संस्था याबरोबरच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन पूर्ण करण्यात आला. सदरील सहलीचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य तथा संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांच्या नियोजनाखाली पाचव्या अधिष्ठाता समन्वय समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वृद्धिंगत करणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना शक्तीला पुरेशी संधी उपलब्ध करून देणे आणि पदवी शिक्षणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकीय विकास रुजविणे अशा उदात्त हेतुने, या शैक्षणिक सहलीचे आयोजन दि 24 फेब्रुवारी 2025 ते 01 मार्च, 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये 375 विद्यार्थी आणि 10 प्राध्यापक, 7 प्राध्यापिका सहभागी झाले होते.
या शैक्षणिक सहलीच्या प्रथम चरणामध्ये राज्यातील कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये कार्यरत कंपन्या ना भेट देऊन माहिती घेतली. तसेच ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला, विविध सागरी किनारे, कृषी महाविद्यालये ई. ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संपादित केली.
या शैक्षणिक सहलीच्या द्वितीय चरणामध्ये, गोव्यातील राष्ट्रीय सागर संशोधन संस्था, पणजी, `विविध सागरी किनारे, मंगेश टेम्पल, विविध चर्च , क्रूज इत्यादी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व मनोरंजन ठिकाणी भेट देण्यात आली. शैक्षणिक सहलीच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण च्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन तज्ञ प्रशिक्षकामार्फत विद्यार्थ्यांनी पाण्यातील वेगवेगळ्या राइट्स त्यामध्ये बनाना राईड, बंपर राईड चा आनंद घेऊन बोटिंग मधून मालवणच्या निसर्गाने नटलेल्या खाडीतून हाऊस बोट, पाण्यातील विठ्ठल मंदिर, देवबाग बीच , तूसुनामी आयलँड, गोल्डन रॉक, लाईट हाऊस इत्यादी विविध ठिकाणाचा 14 किलोमीटरचा प्रवास बोटीतून करून सर्व मालवणचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असा पाण्याणी वेढलेला सिंधुदुर्ग किल्ल्याला विद्यार्थ्यांनी बोटीद्वारे भेट देऊन सिंधुदुर्ग किल्ल्याची पूर्ण माहिती संकलन करून गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेऊन गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज याच्या पायाच्या ठशाचे दर्शन घेऊन किल्ल्याची विद्यार्थ्यांनी पाहणी केली आणि सदरील किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले.
सदरील शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून सहलीत सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनींना कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्यमशीलता, उद्योग व्यवसाय, हांगमानुसार पीक उत्पादन, उपलब्ध बाजारपेठा इत्यादी विविध कृषि क्षेत्रातील तांत्रिक मार्गदर्शन व माहिती प्राप्त झाली. आदित्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांचे नैतिक पाठबळ सहलीस लाभले.
या सहलीच्या नियोजन व आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा, डॉ. हिमांशू श्रीवास्तव, प्रा.बालाजी बहिरवाल, डॉ. पी डी खेडकर, प्रा. व्ही बी शिंदे, प्रा. के एस पवार, प्रा. माया शिंदे, प्रा. गव्हाणे, प्रा. पवार, कर्मचारी राऊत, अशोक पवार यांचे परिश्रम व सहकार्य लाभले तसेच सदरील शैक्षणिक सहलीला विद्यार्थ्यांनीही शिस्तीचे पालन करून सदरील शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पूर्ण करून महाविद्यालयास सहकार्य केले त्याबद्दल प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले. सहलीत सहभागी सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी डॉ. आदितीताई सारडा मॅडम यांनी शैक्षणिक सहलीला परवानगी दिली व महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा , प्रा. बालाजी बहिरवाल व सर्व प्राध्यापक यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

