पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर :- महिला जागृत दिनानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालय पत्रकार भवनच्या समोर ऑरेंज सिटी टावर धंतोली नागपूर येथे धंतोली पोलीस स्टेशनचे महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांना महिला दिनानिमित्त महिला पदाधिकारी द्वारे कार्यालय येथे अतिथी स्वरूपात त्यांच्या सन्मान करण्यासाठी बोलवण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर सावित्रीबाई फुले आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चना केली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांचे शॉल श्रीफळ आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची छायाचित्र विदर्भ प्रमुख अश्विनी लिल्लारे, समाजसेविका ज्योती शर्मा, जुही शर्मा यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला संबोधित महिला आघाडी पदाधिकारी नेहा अंबादे, शिल्पा रामेलवार, करुणा हेडाऊ, माला आंबुलकर, रेणुसिंग ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा तसेच जिल्हाप्रमुख सचिन शर्मा शहर संपर्क प्रमुख राहुल हेडाऊ, विधानसभा संघटक राजेंद्र तिवारी, राजेंद्र बोबडे कार्यालय प्रमुख यशवंत डहाके आदि महिला पदाधिकारी व वैद्यकीय दूत या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता उपस्थित होते.

