उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- बुद्धगया महाबोधि महाविहार मुक्तीसाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने १ मार्च पासून ७ मे पर्यंत साखळी उपोषण व धरण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. साखळी उपोषण व धरणा आंदोलन यशस्वी करून ८ मार्च रोजी विशाल आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा समस्त भिक्खूसंघाच्या उपस्थितीत प्रचंड संख्येने बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन सुरुवात झाली. मोर्चा पुढे निघाल्यानंतर महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढे निघाला. हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका यांनी घोषणा देत पंचशील ध्वज फडकवत भिक्खूसंघाच्या नेतृत्वाखाली रोड प्रमाणे पुढे चालत राहिला. छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराजांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून मोर्चा ठरल्याप्रमाणे रूटवर मार्गक्रमण करून पुढे कल्याण टेशन ते तहसिलदार कार्यालया पर्यंत घोषणा देत बौद्ध उपासक-उपासिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेशनवरून तहसिलदार कार्यालय पर्यंत मोर्चा पोहोचला आणि तहसिलदार कार्यालयावर घोषणा देत उपस्थित होता. संपूर्ण कल्याण स्टेशन परिसर बौद्ध उपासकांनी गजबजल्या होता. “बोधगया महाबोधि महाविहार ब्राह्मणांपासून मुक्त झालं पाहिजे”, मुक्त करो मुक्त करो, महाबोधि महाविहार मुक्त करो” आवाज संपूर्ण कल्याण मध्ये गुंजत होता. आज कार्यालयीन सुट्टीचा दिवस असून सुद्धा तहसिलदारांना हा आवाज ऐकू आला आणि त्यांनी आक्रोश मोर्चाला भेट देण्यासाठी काही वेळातच हजार झाले. भिक्खूसंघ व प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भंते गौतमरत्न महाथेरो सर्वांच्या उपस्थितीत तहसिलदारांना निवेदन सादर केले. तसेच बुद्धगया महाबोधि महाविहारा संदर्भात आपली भूमिका मांडून बिहार सरकारचे काला कानून बोधगया टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करून अखिल विश्वातील १८० कोटी बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान महाबोधि महाविहार बौद्धांच्या हाति देण्यात यावे यासाठी महामहीम राष्ट्रपती आयुष्यमती द्रोपदीताई मुर्मु, माननीय प्रधानमंत्री आयु. नरेंद्र मोदी, बिहार राज्याचे मुख्यमंत्री आयु. नितीश कुमार यांच्या नावाने लिहिलेले निवेदन पत्र कल्याण तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आयु. सचिन शेजाळ यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी तमाम बौद्धांचे मनातील व्यथा भिक्खूसंघाने मा. तहसिलदार यांना निवेदन देत असताना व्यक्त केले. बौद्ध धम्मगुरु आणि बौद्ध अनुयायी यांचे न्यायिक हक्काचे मागणी देशाचे वरील निती निर्धारक यांचे पर्यंत पोहोचावेल आणि त्यांचे कडून मिळणारे उत्तरही बौद्ध बांधवांना कळविण्यात येईल, असे ग्वाही आयु. सचिन शेजाळ यांनी महामोर्चात सामील जन-समुदायाला उद्देशून सांगितले.
मोर्चा पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाकडे निघाला मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी यांचे उपस्थितीत संपूर्ण उद्यान भरले होते. उद्यानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने बोध बांधव उभे होते. पंचशील ध्वज मोठ्या संख्येने संपूर्ण कल्याण मध्ये दिसत होते मोर्चा आत मध्ये आल्यानंतर प्रमुख मार्गदर्शक भंदत गौतमरत्न महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील घेऊन उपस्थितांना आशीर्वाद गाथा घेऊन मंगल मैत्री दिले.
बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान अर्थात महाबोधि महाविहार मुक्तिचा सध्याचे आंदोलनात संपूर्ण भारतीय पटलावर आजचा हा मोर्चा सर्वात विशाल होता. हजारो बौद्ध अनुयायी यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून पंचशीलाचे धम्मध्वज हाती घेऊन भगवान बुद्धांचा शांततेचा मार्गाने सदर महामोर्चा पार पाडले बद्दल पोलीस बंदोबस्तात तैनात असलेले वरिष्ठ अधिकारी यांच्या तर्फे मोर्चेत शामिल सर्वांचे कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण शहरातील शासन प्रशासनानेही सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळे आयोजकांच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त आयु. कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयु. ज्ञानेश्वर साबळे, पोलीस दलाचे आयु. महाजन, फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व सर्व पत्रकार बंधू भगिनी असे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. सदर महामोर्चात बुद्धभूमी फाउंडेशनचे भंते प्रियरत्न, भंते प्रियदर्शी, भंते राहुलरत्न, भंते कुंचुक लामा, भंते राहुल बोधी, भंते शाक्यरत्न, भंते कश्यप, भंते शीलरत्न, भन्ते इंदरत्न, भन्ते यामरत्न, भंते तुषीतरत्न, भंते विनय रत्न, भंते धम्मपाल, भंते मोखरत्न व अन्य अनेक भंते उपस्थित होते.
न भूतो न भविष्यती असा हा आक्रोश महामोर्चाचे सफल आयोजनासाठी आयु. नंदिनी साळवे, आयु, नवीन गायकवाड, आयु. अर्जुन साळवे, आयु. विराज निकम, आयु. रोहित खरात, आयु. निर्मलकुमार घुणकीकर, आयु. माधुरी सपकाळे, आयु. भीमराव डोळस, आयु. उमा डोळस, आयु. छाया उंमरे, आयु. केतनभाऊ रोकडे, आयु, प्रणाली बागडे, आयु. राजू रोकडे, आयु. राहुल वाघ, आयु. वैशाली खांडेकर, आयु. कमल हिंगोले, आयु. आनंद सिंग, आयु. सोनाली गायकवाड, ॲड. सोनाली भगत, आयु. लता पडघान, प्रा डॉ. महेंद्र दहिवले, इंजि. बिरजू जाधव, वनिता गंभीर, संगीता भालेराव, सरस्वती राक्षे, आयु. शोभाताई इंगळे, आयु. गणेश मोरे, सुशील मनोहर, आयु. सुरेश गमरे, आयु. शारदा अंभोरे, आयु. भगवान कांबळे, आयु. उत्तम हिरे, उद्योजक सुनील कांबळे, प्रियांका कदम, सविता शिरसाट, आयु. विनायक मनोहर, विनय फुलपगार, महेंद्र ओव्हाळ, चंद्रकांत वाघचौडे ,रमेश साळवे ,माझी महापौर रमेश जाधव संदीप जाधव बाबा , दत्ता वानखेडे , मैत्री महिला संस्था, रिपब्लिकन सेना , पराग मेढे , आण्णा रोकडे , अमोल राजेंद्र तांबे , रमेश गांगुर्डे, आयु. उमेश गोटे, कोविदरत्ने, बहुजन अडवोकेटस असोसिएशन, अडवोकेटस फोर जस्टिस फोरम, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती, डॉ. बबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व सर्व बहुजन पक्ष संघटना संस्था मंडळ विहार यांचे सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेतले. असाच एकजुटीने राहून बौद्धांचे महान पवित्र ध्येय गाठण्यासाठी आठ दिवस निरंतर दानपारमितेने सहकार्य केलेले सर्व दानशूर उपासक-उपासिका यांच्याही खूप खूप मंगल मैत्री.
जोपर्यंत महाबोधि महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत केंद्रीय कमिटी कडून निर्देश प्राप्त होईल त्याप्रमाणे वेगवेगळे मार्गाने आंदोलन चालूच राहील, असे भंतेजींनी उपस्थित जन समुदायास उद्देशून सांगितले. शेवटी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीत व धम्मपालन गाथा, सरणत्तय घेऊन मोर्चाचा समारोप केला.

