सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर ने माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर यांना एक निवेदन प्रेषित केले या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की बल्लारपूर शहरात होणाऱ्या आठवडी व दैनिक बाजार वसुलीच्या कंत्राट दाराला कंत्राट देते वेळेस नगर परिषदेने नियम व कायद्याची अंमलबजावणी करत सर्व वसुली कर्मचाऱ्यांचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेऊन गणवेश तसेच ओळखपत्र व रीतसर निर्धारित दराची पावती द्यावी अशा प्रकारे वसुली कर्मचाऱ्यांनी दुकानदारांसोबत सौजन्याची वागणूक करावी व वसुली कर्मचारी किंवा कंत्राटदार दुकानदारांसोबत गैरवर्तन करत असल्यास त्याकरिता नगरपरिषदेने एक दूरध्वनी क्रमांक तक्रारी करिता प्रसिद्ध करावा सोबतच नगरपरिषदेने हस्तप्रत्रक तसेच जाहिरात फलक लावून निर्धारित दराच्या आकारणीचा जो तक्ता आहे तो प्रसिद्ध करावा अशाच एक निवेदन देऊन वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे.
नियम व अटीला अधीन राहून कंत्राट दराने नगरपरिषद परिसरामध्ये आठवडी बाजार तसेच दैनिक बाजार कर वसुली करावी जेणेकरून कष्टाने मेहनतीने काम करून आपली गुजर चालवणारा शेतकरी व छोटा दुकानदार भाजीपाला विक्रेते यांच्यावर बळजबरी किंवा अरेराईची भाषा अधिकाराच्या धुंदीत कोणीही कंत्राटदार किंवा त्यांच्या कर्मचाऱ्याने करू नये याकरिता 2025 – 26 च्या करारात आपण हे नमूद करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना केलेली आहे व त्याची एक प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांना प्रतिलिपीच्या रूपात देण्यात आलेली आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बल्लारपूर शहराध्यक्ष उमेश कडू, महासचिव गौतम रामटेके, ज्येष्ठ कार्यकर्ते कुंजबिहारी बटघरे, सुधाकर गेडाम, मारुती निवलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती एका पत्रकाद्वारे महासचिव गौतम रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

