प्रदीप खापर्डे नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- अखिल भारतीय कुणबी समाज संघटना तालुका नागभीडच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छावा चित्रपटातील सिनेकलावंत नागभीड नगरीचे सुपुत्र आशिष पाथोडे यांचा सत्कार सोहळा डॅनियल देशमुख यांच्या नविन सभागुहात संपन्न झाला. या प्रसंगी मंचावर सिनेकलावंत व सत्कारमुर्ती आशिष पाथोडे, शिवशंकर कोरे उपप्राचार्य जनता विद्यालय नागभीड, चक्रधरजी रोहणकर जनता विद्यालय नागभीड, सुधाकर राऊत अध्यक्ष अखिल भारतीय कुणबी समाज बचत गट नागभीड, शिरीष वानखेडे माजी नगरसेवक नगरपरिषद नागभीड हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकरजी कोरे यांनी केले त्यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या कार्यावर व जीवनावर समाजाला प्रबोधनात्मक असे मागदर्शन केले तसेच सिनेकलावंत आशिष पाथोडे यांच्या सुध्दा शालेय जिवनातील आठवनींना उजाळा देवून त्यांच्या छावा या चित्रपटातील ऐतिहासिक कामगीरीबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चक्रधरजी रोहणकर यांनी सुध्दा जगतगुरु संत तुकाराम महाराज व यांच्या जीवनमानावर मोलाचे असे मागर्दशन केले तसेच सिनेकलावंत आशिष पाथोडे यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिरीष वानखेडे यांनी सुध्दा सदर कार्यक्रमाप्रसंगी समाजाला मोलाचे असे मागदर्शन केले व सिनेकलावंत आशिष पाथाडे यांना त्यांच्या सिनेसुष्टीतील योगदानाबद्दल व छाया चित्रपटातील भुमिकेबद्दल प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती आशिष पाथोडे यांच्या समाजाच्या वतीने मान्यवराच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सिनेकालावंत आशिष पाथोडे यांनी आपल्या नागभीड येथील शालेय जिवनावर व त्याच्या सिनेसुष्टीतील पदापर्णाबद्दल तसेच छावा चित्रपटातील आपल्या भुमिकेबद्दल अनुभव कथन केले व समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल समाजाचे मनपुर्वक आभार मानले. या कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील नवघडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री पंकज गरफडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला नागभीड तालुक्यातील बहुसंख्येने अखिल कुणबी समाज बांधव उपस्थित होते.

