महाविद्यालय बांधकाम निर्मिती संबंधित वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आदेश
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जाम येते होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न कधी सुटणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून हिंगणघाट विधानसभा मतदार संघात सुरू होती. अखेर हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचे बांधकाम व इतर बाबींचा आढावा घेण्याकरिता आपल्या दालनात बैठक घ्यावी अशी विनंती आमदार समिर कुणावार यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दि. 28 जानेवारी 25 रोजी एका पत्रद्वारे केली होती. त्या अनुषंगाने आज मुंबई येथे मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात हिंगणघाट शासकीय महाविद्यालय बांधकाम व इतर बाबींचा आढावा घेऊन बैठक संपन्न झाली. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तातडीने उभारणी करण्यासाठी पुढील कार्यवाहीस मंत्री हसन मुश्रीफ यांच्याद्वारे प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे, बँक खाते काढण्याचे, डीपीआर तयार करन्याचे, निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले तसेच सोबतच नर्सिंग कॉलेज व कॅन्सर हाऊस्पिटल निर्माण करण्याची सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली. व या सकारात्मक आढावा बैठकीने आमदार समिर कुणावार यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मजबुतीने उभारण्यासाठी या आदेशाने पुन्हा एकदा भरारी मिळाली आहे, हे विशेष.
यावेळी बैठकीत चर्चेदरम्यान वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, राजू गंधारे, सचिन धारकर, अमोल सोनटक्के व सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई धीरन कुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई राजीव निवतकर, जिल्हाधिकारी वर्धा, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई चंदनवाले, उपसचिव वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, श्री. अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा, श्री. नामदेव कामडी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट, व इतर संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

