अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २२ मार्च:- दरवर्षी प्रमाणे या वर्षीही समता सैनिक दल महिला शाखा सिल्लोरी च्या वतीने सावनेर येथील बसस्थानका जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजा अर्चना,माल्यार्पण नंतर महिला कमांडोज ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली.उपस्थित कमांडोंना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी भन्ते शिलारक्षित महाथेरो, समता सैनिक दल कमलेश्वर तहसील प्रमुख विजय कापसे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बागडे, परमानंद मानवटकर, विठ्ठल जनबंधू, सुरेश कापसे, महिला कमांडो ललिता गौरखेडे, रंजना गौरखेडे, ज्योती गौरखेडे, शालू रामटेके, सरला बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष समता सैनिक दल कमांडो उपस्थित होते.
यावेळी समता सैनिक दलाचे कमांडर कापसे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकर चळवळीला बळ देण्यासाठी १३ मार्च १९२७ रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. समता सैनिक दलाचा ९८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, सावनेर आणि कळमेश्वर तहसीलमधील प्रत्येक गावात समता सैनिक दलाच्या शाखा उघडून आंबेडकर चळवळीला बळकट करणे आहे सोबतच आंबेडकरी जनतेवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी देखील ते काम करेल. त्यांनी युवक व युवतींना समता सैनिक दलात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

