सौ. हनिषा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर 26 मार्च:- बल्लारपूर शहरात पाच वर्षापूर्वी करोडो रुपये खर्चून सिमेंट रोड बनविण्यात आले, रस्त्यांवर सुशोभिकरणाच्या नावाखाली पेव्हर बसविण्यात आले, मात्र आता या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, त्याचप्रमाणे कोट्यवधी खर्चून बनवलेले रस्ते ठिकठिकाणी उखडले जात आहेत व पेव्हर गडले जात आहेत. पाईपलाईन आणि वायरिंग करताना फोडलेली रस्त्यानंकळे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष करताना दिसत आहे. पण नळ कनेक्शन साठी “NOC” हवी असेल तर, रोड रिस्टॉरेशनच्या नावाखाली पैशांची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत असताना. पाईपलाईन आणि वायरिंगसाठी उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पैसे घेत नाही काय.? घेत नसेल तर सर्वसामान्यांवर अतिरिक्त बोजा का.? ठेकेदार किंवा संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या पैशांची मागणी केली जात असेल, तर त्या तुटलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का.? अशा रस्त्यांची दुरवस्था ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चूक आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ते इतक्या लवकर तुटत आहेत. अश्या अनेक आरोपाची माळ आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी थेट अधिकाऱ्यांच्या गळ्यात घातले आहेत.

