प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समाज कल्याण जिल्हा परिषदच्यावतीने जिल्हा परिषद 5 टक्के दिव्यांग निधीमधुन दरवर्षी दिव्यांगाकरीता विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाहाकरीता 1 हजार रुपये महिना प्रमाणे प्रती लाभार्थी 12 हजार रुपये याप्रमाणे 660 लाभार्थ्यांना त्यांच्या थेट खात्यात निधीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
सदर योजना ही 100 टक्के अनुदान तत्वावर राबविण्यात येणार असल्याने ज्या लाभार्थ्यांचे दिव्यगत्व जासत आहे अशा लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात आले आहे. सन 2024-25 मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार एकुण 660 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येकी 12 हजार इतका निधी लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भगावतकर यांनी जिल्हाग परिषद निधीमधून राबविण्यात येणा-या योजनाचा लाभ प्राप्त तरतुदीनुसार 100 टक्के खर्च होईल या करीता सातत्याने पाठपुरावा करुन योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी योगदान दिले आहे.