मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून सीताराम भुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्धा – हिंगणघाट विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, आर्वी, देवळी, पुलगाव विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख – आशीष पांडे यांची निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा समन्वयकपदी चंद्रकांत घुसे यांची निवड करण्यात आली आहे. हिंगणघाट क्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुख सतीश धोवे, वर्धा क्षेत्रासाठी निहाल पांडे, हिंगणघाट समुद्रपूर तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, हिंगणघाट तालुका प्रमुख – रवींद्र तायडे, हिंगणघाट शहर प्रमुख – विठ्ठल गुळघाणे, समुद्रपूर तालुकाप्रमुख प्रभाकर चामचोर, समुद्रपूर तालुका संघटक दीपक टोहकर, वर्धा विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक राऊत यांची निवड करण्यात आल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्याची निवड झाली.
वर्धा जिल्हा कार्यकारणी नियुक्ती झाल्याबद्दल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पक्ष सचिव विनायक राऊत,पश्चिम विदर्भ संपर्क नेते अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.