संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय रामपूर येथील समता बौध्द समाज मंडळ रामपूर व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूर कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला विहारांतील पदाधिकाऱ्यांना धम्म बांधव भगिनीं येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयू.मुरलीधर ताकसांडे यांचा हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले. यापूर्वी प्रथम तथागत गौतम बुध्द आणि बोधिसत्व, महामानव, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अगरबती, मेणबत्ती प्रजलीत केले. सामूहिक त्रीशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी डॉ सोनम आशीर्वाद मेंढे समुंद्रपुर जिल्हा वर्धा, धर्मुजी किसन नगराळे उपाध्यक्ष पर्यटन विभाग चंद्रपूर, निकिता रमेश झाडे सरपंच रामपूर यांनी सम्राट अशोक व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती लावून दीप प्रजालित केले.
यावेळी अशोक दुधे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त स्वागत गीतादारे स्वागत केले व समाजप्रबोधन करून मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश वाघमारे आणि वर्षा वाघामारे यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती धर्मुजी किसन नगराळे तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा राजुरा यांनी समाजप्रबोधन करून मंगलमय शुभेच्छा दिल्या आणि भारतीय बौध्द महासभा तालुका राजुराच्या वतीने डॉ.सोनम आशीर्वाद मेंढे यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला आणि प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सोनम आशीर्वाद मेंढे समुंद्रपुर वरून सकाळी 8.00 वाजता निघून तीन तासाच्या प्रवास करून अगदी वेळेवर येऊन आपल्याला अमूल्य वेळ देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि संविधान व चालू घडामोडीवार अतिशय सविस्तर पणे समाज प्रबोधन केले. निकिता रमेश झाडे सरपंच रामपूर यांनी समाज प्रबोधन केले त्यानंतर मुरलीधर ताकसांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सगळ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. सुनील नळे सदस्य इत्यादी प्रमुख उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन आयु.अशोक मेश्राम आणि आभार प्रदर्शन अरविंद तामगाडगे यांनी केले. या कार्यक्रमाला रामपूर व राजुरा शहरातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती .

