संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता दहावी शालांत परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर १०० टक्के निकाल देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.
यात नकुल प्रशांत अटाळकर ने ९५% गुणासह शाळेतून प्रथम, अमय प्रशांत तगनपल्लीवार ने ९४.८% गुणासह द्वितीय तर कु. क्रांती विद्यासागर लिहीतकर ने ९३% गुणासह तृतीय क्रमांक पटकावला आहे. एकुण ५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ४ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण, १८ विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, संस्थेचे सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

