अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर- सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एस.एस.सी.( सी बी एस ई) बोर्ड चा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. तनुष्का आसोले -९६%, द्वितीय क्रमांक कु. गुंजन करडभाजने ९५%, व तृतीय क्रमांक कु.रिया साहनी -९१%, १२ विद्यार्थ्यांनी ८५% च्या वर तर ३१ विद्यार्थ्यांनी ७५% घेऊन यश प्राप्त केले. याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक जिवतोडे, उपाध्यक्ष अंबर जिवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जिवतोडे, संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्या ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे, शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे ,पायल मॅडम, प्रफुल नारनवरे, बारापात्रे सर, पद्मा हिरतकर, प्रणय कापसे, मंगला जोगी, कोमल चौधरी, ममता पवार,वैशाली आसोले, दिनेश निखाडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

