रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- बोगस पांदन रस्ते व शेततळे न करता बिले काढलेली आहेत व भूमिगत गटाराचे तालुक्यात बऱ्याच गावात कामे न करता कुशल दाखल केलेले आहेत त्यामुळे परतूर गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी निलंबणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. याकरिता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयसमोर भीम सेनेच्या वतीने संग्राम भालेराव यांनी उपोषण सुरू केले आहे.
दी. 14/05/2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे भीम सेनेचे शहर अध्यक्ष संग्राम भालेराव हे उपोषण करत आहे. परतूर गटविकास अधिकारी श्री. तांगडे यांनी गटविकास अधिकारी पदाचा दुरुपयोग करून बोगस कामे केली आहेत. मागील वर्षभरातील जुन्या विहीरीचे कुशल बिले दाखल केले आहेत. तसेच बोगस शेततळे व पाणंद रास्ते न करता बिले काढलेली आहेत. तालुक्यातील बर्याच गावात भूमिगत गटार ची कामे न करता कुशल दाखवून बिले लाटली आहेत. तरी त्यांच्या या कामांची चौकशी व्हावी व त्याच्यावर कारवाई व्हावी करिता उपोषण सुरू आहे.

