अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आज एकीकडे शहरातील मुलं मोठ-मोठया शाळेत शिकून व मोठ-मोठ्या ट्युशन (शिकवणी) लावून पास होतात व त्या मानाने खेड्यातील मुलांना शाळेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे ट्युशन (शिकवणी) नसताना फक्त आणि फक्त शाळेत जे शिकविले त्या मार्गदर्शनाच्या आधारे प्राविण्या श्रेणीत पास होतात. नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी च्या निकालात,
सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्था नांदागोमुख अंतर्गत, “गोमुख उच्च माध्यमिक विद्यालया तिष्टी बु”चा इयत्ता दहावीचा निकाल ९३.५४% लागला.
शाळेतील शिकवणी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची शिकवणी नसताना सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही ट्युशन शिवाय प्राविण्या श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे. प्राविण्य श्रेणीत ०४ विद्यार्थी १) वेदांत अनिल टोंगे ८७% २) दिया रमेश ताजने ८४% ३) तेजस्विनी सुधाकर चरडे ८३% ४) यश वासुदेव शेडामे ७७% प्रथम श्रेणीत ०८ विद्यार्थी १) जानवी सुरेश मौजे-६९% २) क्रिश मेघराज हिंगाने-६८% ३) महालक्ष्मी कैलास राऊत-६५.६०% ४)सारंग किसना कुंभारे-६४% ५) तोषिक हेमराज दुधकवरे-६४% ६) मोनाली जनार्धन नेहारे-६३% ७) प्रज्वल संजय टोंगे-६१% ८) आरती चंद्रभान दुधकवरे-६१% द्वितीय श्रेणीत ११ विद्यार्थी व पास श्रेणीत ०६ विद्यार्थी विद्यालयातून पास झालेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष
मोहनराव बा. मोवाडे, संस्थेचे सचिव दिनकरराव ज. जीवतोडे व शाळेचे मुख्याध्यापाक धनंजय पंधरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

