उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणारी घटना समोर आली आहे. सांगली येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगी येणारे पेय देऊन तिघांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ माजली आहे. दिनांक 20 मे मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून, तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे.
1) विनय विश्वेष पाटील वय 22 वर्ष, महिपती निवास, अंतरोळीकर नगर, भाग 1 सोलापूर शहर, 2) सर्वज्ञ संतोष गायकवाड वय 20 वर्ष, एफ 605, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे, 3) तन्मय सुकुमार पेडणेकर वय 21 वर्ष राह. 303 कासाली व्हिला, अभयनगर, सांगली अशी पोलिसांनी बेड्या ठोकणाऱ्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे. ती वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहे. पीडित तरुणी आणि संशयित आरोपी पाटील, गायकवाड हे याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पीडित तरुणी ही एमबीबीएस’ च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट बघण्यासाठी जाऊ असे सांगून मोपेडवरून वान्लेसवाडी येथील रूम वर घेऊन गेले. तेथे त्यांनी तरुणीला गुंगी येणारे पेय पाजले आणि त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली. मध्यरात्री विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी फिर्याद नोंदवून घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. विश्रामबाग पोलिसांनी काही तासांत तीनही संशयितांना अटक केली. विश्रामबाग पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

