पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- ड्रग्ज मुळे नागपुरात अनेक तरुणाचे आयुष्य बर्बाद होण्याचा मार्गावर आहे त्यामुळे पोलिसांनी ड्रग्ज मुक्त नागपूर मोहिमेंतर्गत ‘ऑपरेशन थंडर’ मोहिम सुरू केली आहे. त्याच अंतर्गत अंमली पदार्थविरोधी लढ्याला वेग येत असून, जरीपटका परिसरात मेफेड्रोन (MD) ड्रग्ज विक्री करत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
नागपूर शहरातील चावला चौकात दोन संशयित तरुण एमडी ड्रग्ज घेऊन ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून नितेश विखानी आणि आकाश केवलरमानी या दोघांना पकडले.
पोलिस तपासात त्यांच्या ताब्यातून 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज व दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. हे दोघे मागील अनेक दिवसांपासून ओळखीच्या व्यक्तींना हे अमली पदार्थ पुरवत होते.
पोलिसांनी या दोघांवर लक्ष ठेवून ही कारवाई उघडकीस आणली आहे. अटक केलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणले, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीवर आघात झाल्याचे मानले जात आहे.

