आ. कुणावार यांनी मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत केले अभिवादन..
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२३ जून:- भारतीय राजकारणातील हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आज २३ जून जयंतीदिन हा बलिदान दिवस पाळल्या जातो. प्रखर हिंदुत्ववादी अशा या महान देशभक्त्ताला अभिवादन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आ. समिर कुणावार यांनी याप्रसंगी केले.
उपरोक्त कार्यक्रम आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी स्व. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी शामाप्रसाद मुखर्जी अमर रहे व वंदे मातरम् च्या घोषणा दिल्या.
सदर कार्यक्रमप्रसंगी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय पर्वत, अनुकूल कोचर, विकास इंगळे, अमोल खंदार, भारती महाकाळकर, रवीला आखाडे, पद्मताई कोडापे, रवी काटवले , शंकर मुंजेवार, नरेश युवनाते, अनिल गहरवार, बबलू खेनवाल, विकी राऊत, खुशाल चेले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

