राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वांचा तात्काळ राजीनामा घ्या. राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे राज्यातील शेतकऱ्यांचा भावना दुखावतील या हेतूने वारंवार अपमानास्पद स्टेटमेंट करीत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये व शेतकऱ्यामध्ये त्यांच्या विषयी व सरकार विषयी रोष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात भरीव भर म्हणजे मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असताना एवढ्या महत्वाचा काळात कि ज्या अधिवेशनावर राज्य शासनाच्या सामान्य नागरिकांच्या करातुन खर्च केला जातो. त्या अधिवेशनात शेतकऱ्यांची बाजू न मांडता त्यांच्या हितसंबंधाचा कायद्या विषयी न बोलता मोबाईलवर रम्मी खेळ खेळत असल्याचा व्हिडेओ प्रसार माध्यमासमोर आला असुन हा सर्व अतिशय संतापजनक प्रकार आहे. कारण एकीकडे आपण राज्याचे कृषिमंत्री म्हणून जबाबदारीचे पद घेतलेले आहे. व त्या पदाला शोभणार नाही असे कृत्य आपण सभाग्रहात करीत आहात असे लोक संवेधानिक महत्वपूर्ण पदावर राहण्याचे लायकीचे नाहीत त्यामुळे आपण त्वरित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी श.प. पक्ष रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल असे निवेदन राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा महासचिव राजू मुडे, शहराध्यक्ष विपुल थुल, दिपक चांगल, चेतन काळे, निखिल ठाकरे, हुकेश ढोकपांडे, मनीष मुडे, अभय सावरकर, वैभव भुते, प्रतीक नरुळे, अंकुश दरोळी, अंकित कांबळे, सम्यत फुलकर, तेजस गायकवाड आदी उपस्थित होते.

