रिक्त असलेली पदे ताबडतोब भरा अन्यथा ठिय्या आंदोलन, सरकारी दवाखाना हा दवाखाना नाही तर किड्या मुंग्यांचं घर व गाईचा गोठा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप. मॉड्युलर आयसीयू व ट्रॉमा केअर युनिट सहित सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करा.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वैद्यकीय अधिक्षकांची जागा दोन वर्षापासून रिक्त असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले रुग्णालयात दोन वर्षापासून वैद्यकीय अधिक्षक नसल्यामुळे तात्पुरती प्रभारी चार्ज डॉ. राहुल भोयर यांना देण्यात आला तरी आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक रुग्णालयाला देण्यात यावा.
तसेच या उपजिल्हा रुग्णालयात १०८ कर्मचऱ्यांचा स्टाफ आहे, त्यापैकी सध्या ९० लोकांचा स्टाफ काम करीत आहे तर १८ पदे अजून ही रिक्त आहे त्यात वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ एक पद, प्रशासकीय अधिकारी वर्ग- २ एक पद, वैयक्तिक अधिकारी वर्ग – २ सात पदे, वैद्यकीय अधिकारी वर्ग- ३ नर्सिंग पदे ।, वर्ग. तीन तांत्रिक पदे 2. वर्ग-तीन कार्यालयीन पदे 2, वर्ग-चार पदे ४अशाप्रकारे एकूण १८ पदे रिक्त असून ते तात्काळ भरण्यात यावे तसेच रुग्णालयात मोडूलर आय.सी.यु, ट्रॉमा केअर युनिट, सिटी स्कॅन मशीन असून धूळ खात आहे रुग्णाना बाहेर उपचार करावा लागतो. रुग्णालय परिसरात किडे माकोडे व मुंग्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच रुग्णालयात साफ सफाईवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून रुग्णाला गंभीर आजार होणार नाही याची दक्षता घ्यावी.
त्याचबरोबर पाच वर्षावरील मुलांना देणारी लस तीन महिन्यापासून या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही जिथे औषध वितरण होतात तिथे गाई झोपलेल्या किंवा बसलेल्या अवस्थेत आढळून येत आहे त्याचबरोबर गाईचे मलमूत्र आणि शेण पडलेला अवस्थेत दिसून येत आहे. रुग्णालयात होत असलेल्या गैरसोयीमुळे आणि असला प्रकार पाहून प्रचंड मनस्ताप येथे ॲडमिट होणाऱ्या रुग्णांना होत आहे. रुग्णालयात रुग्ण बरा होण्यासाठी येत असतो परंतु इथे ऍडमिट झाला की उलट तो जास्त आजारी होत आहे याकडे आरोग्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.
वरील सर्व मुद्यांवर शासनाने गांभीर्याने लक्ष घालून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावावा. आणि जनतेला न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करेल नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालूभ वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, किशोर चांभारे, सिद्धार्थ मस्के, जगदीश वांदिले, प्रशांत लोणकर, उमेश नेवारे, अजय पर्बत, जितू रघाटाटे, सुनील घोडखांदे, देवा शेंडे, विपुल वाढई, नितीन भूते, अमोल मुडे, देवा गवई, गजू महाकाळकर, बाळू बाळसराफ, राजू मुडे, सुशील घोडे, हुकेश ढोकपांडे, पंकज भट,आकाश हुरले, रवी बोरकर, वैभव साटोने, निखिल ठाकरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

