विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:– जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल जारावंडी परिसरात सध्या गोवंश तस्करीचा भयावह प्रकार वाढत चालला आहे. हे सर्व प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि बाहेरील राज्यांतील दलालांच्या संगनमताने राबवले जात आहे. स्थानिकांनी वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रीयता यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, हैद्राबाद व अन्य राज्यांतून आलेले दलाल जारावंडी, कसनसुर आणि पेंढरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भाड्याच्या खोल्या घेऊन वास्तव्यास आहेत. या खोल्यां मधूनच ते आपली तस्करीची यंत्रणा चालवतात. विशेष म्हणजे, स्थानीय पोलीस यंत्रणेला या हालचालींची पूर्ण कल्पना असतानाही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी आहे.
सौहंगाव, रोपी माणेवारा, घोटसुळ, पयडी ही गावं सध्या तस्करीच्या मुख्य केंद्रबिंदूंमध्ये गणली जात आहेत. या गावांमधून गुप्तपणे गोवंश गोळा केला जातो आणि नंतर मोठ्या ट्रकांमध्ये कोंबून, अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने त्यांना पुढे रवाना केलं जातं. या ट्रकचा मार्ग जारावंडी – पेंढरी – गट्टा – कारवाफा असा असून, गडचिरोलीमार्गे चंद्रपूर – हैद्राबाद असा प्रवास केला जातो. दुसरी वाहतूक जारावंडी- कसनसुर, हालेवारा- एटापल्ली वरून समोर सिरोंचा मार्गे हैद्राबाद ला ही वाहतूक बहुतेक वेळा रात्रीच्या अंधारात केली जात आहेगोवंशाचे कोंबून नेले जाणे, त्यांचे हाल आणि यातून होणारा मानवीतेचा अपमान पाहून गावकरी बेजार झाले आहे.

