रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- गोळेगाव-कुंभारवाडी वस्तीवरील पुलावरुन पाणी आल्यावर ये-जा करण्यासाठी शालेय विद्यार्थी, महीला व गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रशासनाकडे पुल उंच करण्याची मागणी केलेली असून सुद्धा शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
प्रस्थापित पुढारी व लोकप्रतिनिधी या कुंभारवाडी वस्तीचा फक्त निवडणुकी पुरता वापर करतात. सुविधा मात्र पाच वर्ष गुलदस्त्यातच राहतात. एखादा बळी जाण्या अगोदर प्रशासनाने संबंधित बाब गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर पुलाची उंची वाढवून शेतकरी व गावकरी यांस शालेय विद्यार्थी यांना पुलाच्या पाण्याचा होणारा त्रास दूर करावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

