मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विदर्भामधील अग्रगण्य अशा वणा नागरीक सहकारी बँकेला आर्थिक वर्षे २०२३-२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र स्टेट को-ऑप बैंकर असोसिएशन लि.चा नागपुर विभागामधून २०० ते २५० कोटी ठेवी असलेल्या बँकेमधून पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार वणा बँकेला दुसऱ्यादा प्राप्त झालेला आहे.
दिनांक २३ जुलै २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारी मंत्री श्री बाबासाहेब पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि सारस्वत को-ऑप बैंक मुंबईचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सुधीर कोठारी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी बँकेजवळ ५८९ लक्ष भाग भांडवल, ठेवी २४८ कोटी तर कर्जवाटप १७२ कोटी आणि गुंतवणुक ९१ कोटी तर निव्वळ नफा हा ५०२ लक्ष झालेला होता. यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सुधीर कोठारी यांनी, बँकेला पद्म भुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बैंक पुरस्कार स्विकारतांना मला आनंद होत आहे कारण पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक आगळेवेगळे निर्णायक वळण दिले असून ते विकास साधणारे नेते होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगती, मुलींना मोफत शिक्षण, मुक्त विद्यापिठाची स्थापना तसेच ते क्रांतिकारक, स्वातंत्रसैनिक व विधायक कार्य करणारे प्रभावी मुख्यमंत्री होते अशा या महान नेत्याच्या नावाचा पुरस्कार आमच्या बँकेला सलग दोन वर्षे मिळणे हें माझे व सोबत काम करणारे माझे सहकारी यांच्यासाठी गौरवाची बाब आहे.
बँकेला मिळालेल्या या पुरस्काबद्दल अँड. सुधीर कोठारी, बँकेचे संचालक मंडळ डॉ. निर्मेश कोठारी, सुरेशराव सांयकार, ओमप्रकाश डालीया, डॉ. दिलीय जोबनपुत्रा, हिंम्मतराव चतुर, विपीन पटेल, अक्षय ओस्तवाल, सुरेश नैतानी, अविनाश गांधी, डॉ. वरूण लोढा, मनिष चितलांगे, ज्ञानेश्वरराव लोणारे, सिध्दार्थ दारूंडे, विद्या उत्तमराव भोयर, पुनम महादेवराव बादले यांचे अभिनंदन माजी आ राजु तिमांडे, राजेश कोचर, हरिष वडतकर, माधवराव चंदनखेडे, आफताख खान, मधुकरराव डंभारे, उत्तमराव भोयर, मधुसुदन हरणे, दिगांबरराव चांभारे, राजेश मंगेकर, भागचंद ओस्तवाल, पंकज कोचर, घनश्याम येरलेकर, तेजस तडस, यांनी केले आहे.

