विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड अखेर गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी झाला. पंचायत समिती एटापल्लीच्या सभागृहात, दुपारी २ वाजता, गट विकास अधिकारी व बोगस डॉक्टर तपासणी समितीचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सभा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व समिती सचिव डॉ. भुषण चौधरी, विस्तार अधिकारी (आरोग्य) देवेंद्र नगराळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मडावी, डॉ. राजू स्वामी, तालुका किटकशास्त्रज्ञ श्रावण राठोड, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक कु. आरती कोरेत आणि श्री. अनल उपस्थित होते.
या बैठकीसाठी तालुक्यातील २२ संशयित डॉक्टरांना बोलाविण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ ११ जण हजर राहिले. त्यांच्या सादर केलेल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान केवळ एका व्यक्तीकडे बीईएमएसची अधिकृत पदवी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संबंधित पॅथीमध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले.
मात्र, उर्वरित डॉक्टरांमध्ये अनेकांकडे केवळ डिप्लोमा, अपूर्ण शिक्षण किंवा खोटी कागदपत्रे असल्याचे उघड झाले. यामध्ये दिपंकर दीपक सरदार (D. Pharm), आशुतोष चितल मंडल (D. Pharm), राकेश गौर मंडल (DMHS), संजय मंटू करमरकर (BAMS (AM)) आणि दुलाल सिकदार (RMP) या व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, दुलाल सिकदार यांनी दुस्सागुड्डा येथे मलेरियाग्रस्त रुग्णावर औषधोपचार क�

